‘या’ बँकेत तुमचं खातं असेल तर सावधान! महिन्याभरात बंद होईल अकाउंट…

या नागरिकांचे बँक खाते पडणार बंद

इथे क्लिक करून पहा

बँकेत (Bank) व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. तुमचे जर पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खाते असेल तर तुम्हाला सावधान व्हावं लागेल. कारण, पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केलाय. बँकेनं दिलेल्या माहितीनुसार काही ग्राहकांची खाती बंद केली जाणार आहेत. खात्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये म्हणून निर्णय घेतला जाणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.bank news

या नागरिकांचे बँक खाते पडणार बंद

इथे क्लिक करून पहा

डिमॅट खाती बंद करण्यात येणार नाहीत

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेनं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. अनेक घोटाळा करणारे लोक व्यवहार होत नसलेल्या खात्यांचा गैरवापर करतात. त्यामुळं बँकेनं कोणत्याही प्रकारचा खात्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून खाती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, खात्यांची गणना 30 एप्रिल 2024 च्या आधारावर केली जाणार आहे. बँक डिमॅट खाती बंद करण्यात येणार नाहीत. ही नियम डिमॅट खात्यांसाठी लागू होणार नाही.bank news

‘ही’ खाती बंद केली जाणार नाहीत

दरम्यान, मिळालेल्आ माहितीनुसार, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना यासारख्या योजनांसाठी उघडण्यात आलेली खाती बंद केली जाणार नाहीत. त्याचबरोबर अल्पवयीनांचे बचत खातेही बंद होणार नसल्याची माहिती बँकेनं दिली आहे. दरम्य़ान, एखाद्या ग्राहकाचे व्यवहार न झालेले खाते जर बंद केले आणि ते खाते पुन्हा सुरु करायचे असेल तर करता येते का? असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल. तर याच उत्तर हो आहे. खाते पुन्हा सुरु करण्यासाठी ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. तसेच केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर त्यांचे खाते सुरु होणार आहे.

Leave a Comment