10वी-12वीचा निकाल : वेळ, वेबसाईट जाहीर

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या की निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या निकालावर भविष्य अवलंबून आहे. दरवर्षी निकाल उशिरा येतो. मात्र यंदा वेळेवर निकाल जाहीर करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. 12वीचा निकाल 25 मे पूर्वी तर 10वीचा निकाल 5 जूनपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. राज्यात 10वीच्या परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत, तर 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाल्या होत्या. आता विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. इतर राज्यांमध्येही निकालाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आता राज्यात दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठे अपडेट्स येत आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढत आहे. निकाल लागल्यानंतर पुढील वर्षी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते.

 

 

विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचा निकाल याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल. मात्र, या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.

 

विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने निकाल बघता येईल. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना वरील दिलेल्या साईटवर जावे लागेल आणि तिथे आपला परीक्षा क्रमांक टाकावा. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केले की, विद्यार्थ्यांचा निकाल दिसेल.

 

 

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-1 लागणार

दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर-2 लागणार

 

यंदा बारावीच्या परीक्षेला तब्बल 14 लाख 28 हजार विद्यार्थी बसले होते. दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. बारावीची परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यंदा भरारी पथकाच्या संख्येत देखील मोठी वाढ करण्यात आली होती.

काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी यंदा बोर्डाकडून कंबर कसण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर बंदोबस्तही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. आता सर्वांच्या नजरा या निकालाकडे आहेत. याच महिन्यात दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

Leave a Comment