किसान क्रेडिट कार्ड

देशातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्डच्या मार्फत सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बँकांचा जाच कमी करण्यासाठी केंद्राने हे पाऊल टाकले आहे. सध्या देशातील दोनच जिल्ह्यासाठी ह प्रयोग करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील फारुखाबाद आणि राज्यातील बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रायोगित तत्वावर हा प्रयोग राज्यातील बीड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. मे महिन्यापासून याप्रकल्पाचा श्रीगणेशा जिल्ह्यात सुरु होत आहे.