नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

e-Pan Download Process : आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा पॅन कार्ड हरवते अथवा खराब होते. अशावेळी आयटीआर फाइल करताना मोठी समस्या येते. तुमचे पॅन कार्ड हरवले असल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सहज ई-पॅन डाउनलोड करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

 

 

नवीन डिजिटल पॅन कार्ड डाउनलोड करा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

इथे क्लिक करा

 

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे

आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. सरकारने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड नसल्यास आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता सरकारने ऑनलाइन इंस्टंट पॅन देण्यास सुरुवात केली आहे.

 

असे डाउनलोड करा ई-पॅन:

ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम incometax.gov.in च्या वेबसाइटवर जा. हे आयकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल आहे.
येथे तुम्हाला Instant e-PAN चा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून New e-PAN यावर जा.
आता तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकावा लागेल.
आता Terms and Conditions अ‍ॅक्सेप्ट करा.
माहिती भरल्यानंतर चेक करून सबमिट करा.
त्यानंतर तुम्हाला ई-पॅन कार्डची पीडीएफ कॉपी तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर मिळेल. अशाप्रकारे, तुम्ही घरबसल्या अवघ्या काही मिनिटात ई-पॅन डाउनलोड करू शकता.

 

 

 

Leave a Comment