आधीच माझी वाट लावली आहे…” कॅमेरामॅनला पाहताच रोहित शर्माने जोडले हात, VIDEO होतोय व्हायरल

मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने ६८ धावांची शानदार खेळी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितची बॅट शांत होती. पण या सामन्यात मात्र रोहितच्या बॅटमधून वादळी खेळी पाहायला मिळाली पण मुंबईने १८ धावांनी मात्र सामना गमावला. या सामन्यापूर्वी वानखेडेवरील रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो कॅमेरामॅनला होत जोडून ऑडिओ बंद करण्याची विनंती करत आहे. पण नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊया.

 

 

काही दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा त्याचा जुना मित्र अभिषेक नायरशी बोलत होता. नायर केकेआरच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे. केकेआरने रोहित आणि नायर बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हार्दिकच्या आगमनानंतर मुंबई इंडियन्समध्ये होणाऱ्या बदलांबद्दल रोहित बोलत होता. त्यानंतर केकेआरने व्हिडिओ डिलीट केला पण तोपर्यंत हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओमधील रोहितची वक्तव्य आताही काही सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत.

 

IPL 2024 च्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली. एकदा तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरा होता. मात्र त्यानंतर रोहितच्या बॅटमधून धावा येणे थांबले. मात्र, अपयशानंतर मोसमातील शेवटच्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपली. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने झटपट अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूत २० चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावांची खेळी खेळली. ज्यामुळे मुंबईला चांगली सुरूवात करून देता आली पण नंतर मात्र इतर फलंदाजांची योग्य साथ न मिळाल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम खेळताना २१४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात चांगली सुरुवात करूनही मुंबई संघाला केवळ १९६ धावा करता आल्या. यासह मुंबईचा आयपीएल २०२४ मध्ये शेवटच्या स्थानी कायम आहे.

Leave a Comment