MPSC परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ सुधारित तारीख जाहीर केली असून दि. ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अराखीव खुला गटातून अर्ज केलेल्या तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करता येणार आहेत. युपीएससीप्रमाणे एमपीएससीनेही नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी यासाठी उमेदवारांनी केलेल्या मागणी संदर्भात लोकमत ने बातमी प्रसिद्ध केली होती.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2024 वर्षासाठी MPSC परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जे उमेदवार MPSC परीक्षा 2024 ला बसण्याची योजना आखत आहेत ते खाली दिलेले MPSC परीक्षा 2024 वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तुम्ही MPSC तात्पुरती परीक्षा वेळापत्रक 2024-25 थेट खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता. MPSC ने 2024 मध्ये होणार्‍या सर्व प्रमुख परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षा 2024 साठी तपशीलवार वेळापत्रक अपलोड केले आहे. MPSC परीक्षा वेळापत्रक 2024 मराठीत डाउनलोड करा.

 

MPSC परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

इथे क्लिक करा

 

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ करीता दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आणि दि. २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षेचे आयोजन केले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दि. २६ फेब्रुवारी रोजी राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरीता आरक्षणाची तरतूद करण्यात आली. आयोगाने आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत राज्य शासनास कळविले तसेच दि. २१ मार्च रोजी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

 

 

Leave a Comment