MPSC मध्ये या पदांची मोठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख

mpsc update : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्याचे नियोजित होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अनुसार आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक ०६ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

दाचे नाव – राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पदसंख्या – 524 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024

 

पदाचे नाव पद संख्या
राज्य सेवा परीक्षा 431
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 48
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 45

 

 

 

Maharashtra Civil Services Combined Preliminary Important Date

 

 

PDF जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करा

 

 

Leave a Comment