MSRTC Big News लहानापासून ते मोठ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आता सर्वांनाच एसटी बसचा मोफत प्रवास

MSRTC Big News राज्य सरकारने ‘महिला सन्मान योजना’ घोषित करून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधील प्रवासात महिला व मुलींना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. राज्यात १७ मार्च २३ पासून सरकारने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के तिकीट सवलत देऊन ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली.

 

योजनेमुळे महाराष्ट्रात सगळीकडे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या १० ते २० पटीत वाढ झाली आहे.

 

यात पुणे विभागातून १७ मार्च २०२३ ते १७ मार्च २०२४ दरम्यान वर्षभरातून अडीच कोटी महिलांनी MSRTC Big News एसटीमधून प्रवास केला असून, महिला प्रवाशांकडून वर्षभरातून तब्बल १०६ कोटी २४ लाख ३६ हजार रुपये इतके उत्पन्न प्राप्त असले तरी यातून ५० टक्के सवलत असल्याने खऱ्या अर्थाने ग्रामीण, निमशहरी, शहरी भागातील सामान्य गरीब महिलांचे यातून तब्बल १०६ कोटी २४ लाख ३६ हजार रुपयांची बचत झाल्याचे दिसून येते.

 

 

पूर्वी एसटीतून प्रवास करायचा म्हटल की ज्येष्ठ नागरिकांनाच सवलत होती मात्र महाराष्ट्र सरकारने ‘महिला सन्मान योजना’ घोषित करून सर्वच महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन ५० टक्के रुपयांची महिलांची बचत होत आहे. पुणे एसटी विभागातून तब्बल अडीच कोटी महिलांनी प्रवास केला असून, महिल प्रवाशांकडून वर्षभरातून तब्बल १०६ कोटी २४ लाख ३६ हजार रुपयांची बचत झाली आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment