T20 World Cup 2024 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचा सामना या देशाविरूद्ध होणार

t20 world cup match time table 2024 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या यजमानपदाखाली जूनमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतासहित इतर अनेक देशांनी आपला संघ जाहीर केला आहे. आयसीसीकडून टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक फार अगोदक घोषित करण्यात आले आहे. पण आता टी-२० वर्ल्डकपसाठी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारताचा सामना कधी, कुठे आणि कोणाविरूद्ध खेळवला जाणार आहे, जाणून घ्या.

 

👉टी-२० वर्ल्डकपसाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक इथे क्लिक करून पहा👈

 

t20 world cup match time table 2024 : टी-२० विश्वचषकाचे सराव सामने २७ मे ते १ जून या कालावधीत अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे खेळवले जातील. विश्वचषकापूर्वी एकूण १६ सराव सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने टेक्सासमधील ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, फ्लोरिडातील ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, क्वीन्स पार्क ओव्हल आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे आयोजित केले जातील.

Leave a Comment