lek ladki yojana Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/lek-ladki-yojana/ My WordPress Blog Thu, 06 Jun 2024 04:56:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://krushikranti.krushibatami.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Krushi-Kranti-1-32x32.png lek ladki yojana Archives - Krushi Kranti https://krushikranti.krushibatami.com/tag/lek-ladki-yojana/ 32 32 या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/ https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/#respond Thu, 06 Jun 2024 04:56:28 +0000 https://krushikranti.krushibatami.com/?p=561 महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या बातमीत आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार ... Read more

The post या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या बातमीत आपण लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहे.

पात्रतेचे निकष काय ?

लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे.

या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. अशी ही एकूण 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल, असं सांगितलं गेलंय.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी निवड कशी होणार?

  • ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
  • मतदान ओळखपत्र
  • शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज केल्यानंतर पुढे काय ?

अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.

त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.
प्रशासकीय यंत्रणेनं 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे.

एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

The post या रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार 1,01,000 रुपये खात्यात होणार जमा लाभार्थी पहा appeared first on Krushi Kranti.

]]>
https://krushikranti.krushibatami.com/lek-ladki-yojana/feed/ 0 561