महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर संपूर्ण वेळापत्रक पहा

Women’s T20 World Cup 2024 : महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक खेळवला जाईल. बांगलादेशची राजधानी ढाका आणि सिल्हेट येथे हे सामने खेळवले जातील. एकूण दहा संघ १८ दिवसांत २३ सामने खेळतील. कट्टर प्रतिस्पर्धी अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असेल. अॅलिसा हिलीच्या नेतृत्वात कांगारूंचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहण्याजोगे असेल.

 

 

संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Women’s T20 World Cup 2024 : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल.

 

 

Leave a Comment